नेरुळ : घणसोली गावातील आठवडे बाजारावर आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. काल दिनांक ३० जुलै २०१७ रोजी या आठवडे बाजारावर कारवाई करण्यात आली. घणसोली गावात दार रविवारी आठवडे बाजार भरतो मात्र; राजकीय दबावापोटी या ठिकाणी तुरळक अथवा कारवाईच होत नसे. मात्र पालिकेने नाहरिकांसाठी सहज व सोप्या पद्धतीने आणलेल्या ऑनलाइन पद्धतीने आलेल्या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली.
घणसोली गावातील विकास संस्थेने नवी मुंबई महानगरपालिकेच्या पोर्टलवर काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. दार रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे येथील नागरिकांना याचा त्रास होत होता. फेरीवाल्यांमुळे या ठिकाणी रहदारीचा प्रश्न निर्माण होत होता तर नागरिकांना चालणे मुश्किल होत होते.तर यामुळे गावाला गलिच्छ स्वरूप प्राप्त होत होते. पालिकेने संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रात नागरिकांसाठी भाजी मंडई व मासे मंडई तयार केल्या आहेत. मात्र असे असताना देखील येथील पूर्वापार गावठाण क्षेत्र असताना चालू असलेला हा बाजार तसाच चालू होता.त्यामुळे २१ व्या क्षेत्रातील शहर म्हणून देशभरात ओळख असलेल्या शहराला आठवडे बाजाराने ग्रासलेले दिसून येत होते. मात्र पालिकेने याची दखल घेत चक्क रविवारी सर्वात मोठी कारवाई या बाजारावर केल्यामुळे फेरीवाल्यांची मात्र तारांबळ उडाली. रविवार असल्याने बेसावध।असलेल्या या फेरीवाल्यांवर ही कारवाई केल्याने फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईने घणसोली गावातील डी मार्ट पर्यंतचा रस्ता मोकळा झाल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले.
यावेळी पालिकेने फवरीवाल्यांचा संपूर्ण माल जप्त करून जागा रिकामी केली. यामुळे पदपथ मोकळे करण्यात आले असले तरी मासे विक्रेत्यांवर मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. या मास विक्रेत्यांना पालिकेने पर्यायी जागा मिळेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी दिलेली आहे. यावेळी तक्रार करणाऱ्या विकास संस्था व घणसोली प्रकल्पग्रस्त संस्थेचंस कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी दर रविवारी येथे कारवाई केली जाईल असे आश्वासन संस्थेतील पदाधिकाऱ्यांना दिले आहे.