शहादा । शहादा पालिका हद्दीतील पाटबंधारे विभागाच्या पाटचार्यांवरील अतिक्रमणधारकांना नोटीसा बजाऊनही अतिक्रमणे जैसै थे आहेत. नोटिसांना अतिक्रमण धारकानी केराची टोपली दाखविली आहे. यामुळे पाटचार्यांवरील अतिक्रमणे निघतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहादा शहरातुन पाटबंधारे विभागांची पाटचारी गेलेली आहे. डोगरगाव रोड मार्ग तहसील कार्यालयालगत भाजीपाला मार्केट, म्युसिपल स्कुल, रेडलाईट परिसर तसेच जुना मामाचे मोईदा रोड, सप्तश्रृंगी माता मंदिररोड या भागातुन जवळपास 3.7 आणि 2.4 कीलो मिटर लांबीची एकुण 6.1 किलो मिटर लाबांची पाटचारी गेलेली आहे. ह्या पाटचार्या शासनाचा पाटबंधारे विभागांची असुन सर्वच पाटचार्यांवर व्यवसायिकांनी कच्या व पक्क्या स्वरूपाची अतिक्रमणे केलेली आहेत.
रेडलाईट एरियात अतिक्रमित घरे
भाजी मार्केटलगत गेलेल्या पाटचारीवर कुप्रसिद्ध रेडलाईट येरियात 30 ते 35 घरे अतिक्रमण करून बांधण्यात आली आहेत. यासोबतच पाटचार्यांवर सर्वत्र अतिक्रमणे करण्यात आली आहेत. शहादा पंचायतीतर्फे आमदार उदेसिंग पाडवी उपस्थित झालेल्या आमसभेत पाटचार्यांवरील अतिक्रमणाचा विषय गाजला होता. त्यासभेत पाटबंधारे विभागाचा अधिकार्यांना धारेवर धरण्यात येऊन पाटचार्यांवरील अतिक्रमणे काढण्याचे बजविण्यात आले होते. तत्पुर्वी हा विषय अधिकार्यांच्या अंगलट येणार म्हणून पाटबंधारे विभागाचा अधिकारी यांनी सर्वे करून पाटच्यावरील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याबाबत नोटिसा बज्यावल्या होत्या. एकुण तीन नोटिसा देऊन ही अतिक्रमणे काढण्यात आलेले नाहीत. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी नोटिसा देण्यापलीकडे कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
अवैध व्यापारीगाळ्यांचे बांधकाम
या विभागाचे कार्यकारी अभियंता सुर्यवशी यांनी पाटचार्यांवर झालेली अतिक्रमणाची पाहणी करण्याचा देखावा करीत त्याकडे दुर्लक्ष केले आहे. तर अतिक्रमणधारकांनी पाटबंधारे विभागाचा नोटिसाना केरांची टोपली दाखवली आहे. पाटबंधारे विभाग व अतिक्रमणधारकांचे काही साटेलोटे झाले तर नाहीना असाप्रश्नही उपस्थित होत आहे. व्यवसायीकांच्या अतिक्रमणाबरोबर शहराला शाप ठरलेल्या देहविक्रीच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध रेड लाईट येरियातील पाटचारी वरील घरांची अतिक्रमणे सध्या गाजत आहेत. पाटबंधारे विभागाचा अर्थपुर्ण संबंध या अतिक्रमणधारकांची तर नाही ना अशी शंकाही उपस्थित होत. सोबतच पालिका प्रशासनाची देखील दुर्लक्ष झालेले आहे. यामुळे पाटचार्यांवरून अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावीत अशी मागणी होतं आहे. सप्तश्रीगी मंदिर ते प्रकाशा रोड मार्गे गेल्या पाटबंधारे विभागाच्या मोठ्या पाटचारीवर एक अज्ञात व्यक्तीने चार व्यापारी गाळे बांधून अतिक्रमण केले आहे.