फैजपूरातील नगरसेवक एकवटले ; जिल्हाधिकार्यांना निवेदन
फैजपूर:- फैजपूर नगरपालिके विरोधात निलेश मुरलीधर राणे व विनोद अरुण चौधरी हे विविध विकासकामांना आळा बसण्यासाठी व सुरळीत सुरू असलेली कामे बंद करण्याकरीता वारंवार खोट्या तक्रारी करीत असून त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना पालिकेच्या 20 नगरसेवकांनी एकत्र येत निवेदन दिले.
मुख्याधिकारी व संवर्गातील कर्मचार्यांनी मुख्यालयी रहावे
मुख्याधिकारी व तीन संवर्गातील कर्मचारी यांनी ये-जा न करता मुख्यालयी राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आले आहे. माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी या संदर्भात जिल्हाधिकार्यांकडे लेखी तक्रार केली असता यासंदर्भात फैजपूर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत चौकशी केली असता अहवालानुसार जिल्हाधिकार्यांनी मुख्याधिकारी व संवर्गातील दिलीप वाघमारे, विशाल काळे, संजय बाणाईते यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आपली तक्रार प्रशासनाविरोधात -निलेश राणे
आपली तक्रार ही प्रशासनाच्या विरोधात आहे. मुख्याधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयी रहावे, असा शासनाचा आदेश आहे त्यानुसारच मी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती आणि मी दोन वेळा नगराध्यक्ष राहिला असल्याने मी खोट्या तक्रारी करू शकत नाही. एक वर्षात मी कुठलीही विकासकामे थांबवली नाही. नगरसेवक हे अंगावर ओढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे म्हणाले.