पालीकेच्या सर्व विभागांतील कामांची एसआयटी चौकशी करा

0

आमदार गोटे यांचे कट्टर समर्थक संजय बगदे यांची माहिती

धुळे – महानगरपालिकेच्या नवीन इमारतीचीच नव्हे तर महापालिकेने केलेल्या शहरातील सर्व विभागांतील कामांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी आ. गोटे यांचे कट्टर समर्थक संजय बगदे यांनी केली आहे. बगदे यांनी प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे की, धुळे महापालीकेच्या नवीन इमारतीला गळती लागली म्हणून शिवसेनेच्या महानगर प्रमुखांनी इमारतीच्या कामांत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. गेल्या 5 वर्षात त्ंयांच्या प्रभागापासून संपूर्ण धुळे शहरात झालेल्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. 77 नगरसेवकांनी डोळयावर भ्रष्टाचाराची झापडे लावून शहराचा विकास बंद डोळयांनी केला आहे. मनपाची इमारत बांधली जात असतांना त्यावर लक्ष दे ण्यात आणि चांगले कामे करण्यात नगरसेवक अकार्यक्षम ठरले आहेत. याचाच पुरावा म्हणजे आपण करण्याय लग यासाठी आ. गोटेंकडे बोट दाखविला. आ. गोटे हे एसआयटी चौकशी मागणी करणार का? असा सवाल शिवसेनच्या महानगरप्रमुयांनी केला आहे. मनपाचा कारभार पाहण्यासाठी धुळेकरानी नगरसेवकांना निवडून दिले. महानगरपालिकेचे कुंपणच शेत खात आहे. त्यामुळे अशा नगरसेवकांना घरचा रस्ता दाखविला पाहिजे. मनपा इमारतीच्या झालेल्या भ्रष्टाचार करणार्‍यांची नावे विरोधी पक्षाचे नगरसेवक या नात्याने आपण जाहीर करावीत, तसेच प्रभागातील कामांची देखील चौकशीची मागणी करावी, असे बगदे यांनी पत्रकात म्हटले आहे