पालीवाल समाजातर्फे कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शोभायात्रा

0

लोहारा । पालीवाल समाजातर्फे मॉ आशापूर्णा देवीच्या कृपेने 12 वर्षानंतर गुरडिया (सोयत) तालुका सुसनेर जिल्हा आगर मध्यप्रदेश येळे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी 1 ते 6 एप्रिल रोजी कुंभमेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन आणि निमंत्रणासाठी पालीवाल समाज जनजागरण गौरव रथ यात्रेचे 29 जोनवारीपासून मॉ आशापूर्णा धाम गुरडिया येथून सुरूवात झालेली आहे. भारतभ्रमण करून ही रथ यात्रा गुरूवारी लोहार येथे पोहचली होती. पालीवाल समाजातर्फे पुष्पवर्षांव करून या रथाचे स्वागत करण्यात आले. दुर्गा माता मंदिराजवळ शोभायात्रेची सर्व समाजबांधवांनी पूजी, आरती केली. या आरतीला सरपंच चित्रा महाजन, उपसरपंच अक्षय जैस्वाल, कृषिभूषण विश्वासराव पाटील, लोहारा पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील सुरेंद्र शेळके आदी उपस्थित होते.

गरबा खेळून व्यक्त केला आनंद
मान्यवरांचे स्वागत करून मॉ आशापूर्णा देवीची प्रतिमा भेट दिली. गावातील मुख्य चौकांतून सवाद्य शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी समाजबांधवांनी एकच पेहराव परिधान करून शिस्तीतीत शोभायात्रेत सहभाग घेतला. यावेळी महिला व युवतींनी गरबा खेळून आणि गाणे गाऊन आंनद व्यक्त केला. महादेव मंदिर येथे आरती घेऊन शोभा यात्रा संपन्न झाली. यशस्वीतेसाठी संजय पालीवाल, शैलेश पालीवाल, नितीन पालीवाल, शाम पालीवाल, अभिषेक पालीवाल आशिष पालीवाल, राकेश पालीवाल, जितेंद्र पालीवाल, मनीषा पालीवाल, करूणा पालीवाल आदी समाजबांधवांनी कामकाज पाहिले. या शोभा यात्रेची रूपरेषा, आयोजन आणि आभार महाकुंभ लोहारा क्षेत्र प्रमुख पंकज पालीवाल यांनी केले.