जळगाव । येथील संत चोखामेळा बुध्दविहारतर्फे घेण्यात आलेल्या पाली भाषा परीक्षा स्पर्धेचा निकाल रविवार, 11 रोजी जाहिर करण्यात आला. या स्पर्धेत 72 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा भंतेजी अश्वजित व भन्ते संघरत्न यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 103 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. प्रारंभी भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस भन्तेजींच्या हस्ते पुष्प, दीप आणि धुप अर्पण करण्यात आले. यानंतर उपस्थित उपासक, उपासिकांनी त्रिसरण पंचशिल अनुसरण्यासाठी भन्तेजींना याचना केली. भन्तेजींनी उपस्थितांकडून त्रिसरण पंचशिल म्हणून घेऊन धम्म देसना आत्मसात करुन दिले. यानंतर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार करण्यात आला.
यांनी मिळविले यश
स्पर्धेत माधुरी साळुंखे हिने प्रथम, अर्चना रामटेके व ताराचंद आहिरे यांनी द्वितीय तर सपना शिंदे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना सन्मानचिन्ह, धम्मपदग्रंथ व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. अहवाल वाचन रजनी बागडे यांनी केले. सुत्रसंचालन विजय गायकवाड यांनी केले तर आभार राहुल सोनवणे यांनी मानले.