सातपुड्याच्या अभयारण्यात उभारली गतवर्षी नऊ तर नवीन चार पाणवठे
रावेर- तालुक्यातील पाल परिसरातील अभयरण्यात सातपुड्याच्या कुशीत वास करणार्या वन्यजीव वन्य प्राण्यामुळे सातपुड्यातील पाल वैभव लाभले होते परंतु बेसुमार वृक्ष तोडी व वन्य प्राण्यांच्या वास्तव असलेल्या वनराईवर वन जमिनी वर अतिक्रमणामुळे वन्य प्राण्यांना व वन्यजीवांना दिवसा-ढवळ्या भटकावे लागत आहे. पाल परिसरातील सातपुड्यात नदी नाले सुकी नदी सह बंधारे संपूर्ण आटले असून पाण्यामुळे वन्यजीवाचे हाल होत होते.
राजेश पवार यांनी तयार केले 15 पाणवठे
वन्यप्राणी वन्यजीवांचे हाल पाहून व त्याची दखल घेवन पाल वन्यजीव वनक्षेत्रपाल राजेश पवार यांनी उन्हाची दाहकता जाणून तात्काळ उपाययोजना केली व जंगलात ठिकठिकाणी मोठे मोठे 15 कृत्रिम पाणवठे तयार केले व त्यात पाण्याची सुविधा केली.
टँकरद्वारे पाणवठ्यात पाणी
पाल अभयारण्यात कृत्रिम पाणवठे तार करून त्यात दररोज टँकरने पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या उपाययोजनेमुळे वन्यजीवांना जीवदान मिळाले आहे. पाण्याच्या शोधामुळे प्राणी गावाकडे धाव घेत नाही तर त्यांच्या जीवाचाही धोकाही आता कमी झाला आहे. वन्यजीव विभागातर्फे जंगलात पाणवठे तयार केले त्यात पाण्यची क्षमता कमीत-कमी दहा हजार लीटर असून दर दहा दिवसानंतर या पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.