पाल येथून अल्पवयीन मुलीस पळवले

A minor girl was abducted from Pal रावेर : तालुक्यातील पाल येथील एमआयडीसी भागातील एका गिट्टी प्लॉटवर राहत असलेल्या कुटुंबातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस संशयीत आरोपी गुड्डा ईडला भील (पाल, ता.रावेर) याने पळवून नेल्याची घटना मंगळवार, 13 रोजी दुपारी 12 वाजता घडली.

रावेर पोलिसात गुन्हा
या प्रकरणी मुलीच्या पित्याने रावेर पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपी गुड्डा भील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आाल. तपास उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत.