रावेर । तालुक्यातील सातपुडा पर्वतामधील वन संरक्षण आणि वृक्ष लागवड कामाची पाहणी करण्यासाठी वन विभागाचे पालक सचिव तथा अप्परप्रधान मुख्य वनसंरक्षक श्री आश्रफ यांनी भेट देवून पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे. या दौर्याप्रसंगी आश्रफ यांच्यासह मुख्य वनसंरक्षक कदम, उपवनसरक्षक संजय कुमार दहीवले, सहाययक वनसरक्षक अशोक नाले हे उपस्थित होते. रावेर वनक्षेत्रातील पाल परिमंडळातील निमड्या नियत क्षेत्रात 56 यातील ‘ए’ आर प्रथम वर्ष रोपवनाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
वन परिक्षेत्र अधिकार्यांच्या कामकाजाविषयी समाधान
तसेच रावेर परिमंडळातील कुसुंबा पश्चिम नियतक्षेत्रात कं नं 30 यात पीपीओ कामाची पाहणी करून आखणीबाबत मार्गदर्शन केले, सहस्रलिंग परिमंडळातील नियत क्षेत्रातील कं नं 14 येथे सीएनबी कामाची पाहणी करून सूचना दिल्या रावेर वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांचे कडून माहिती जाणून घेऊन समाधान व्यक्त केले आहे.