पाळण्यातून सेल्फि काढताना दोन तरुण गंभीर

0
अट्रावलच्या मुंजोबा यात्रोत्सवात ओढवले संकट
यावल :- तालुक्यातील अट्रावल येथील यात्रेत मोठ्या पाळण्यात सेल्फी काढतांना दोन तरुण खाली पडल्याने जखमी झाले तर त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अट्रावलला मुंजोबा यात्रोत्सव सुरू असून मोठ्या प्रमाणावर पाळणेही दाखल झाले आहेत.
तालुक्यातील चितोडा येथील योगेश सोपान भारंबे (20) व शेखर वसंत तेली (24) हे उंच पाळण्यावर गेल्यानंतर त्यांना सेल्फिचा मोह झाला. याचवेळी त्यांचा तोल गेल्याने ते खाली कोसळले. योगेश भारंबे (वय 20) यास डोक्याला जबर मार लागला असून तर शेखर तेली (वय 24) याचा डावा हात मोडला गेला आहे. दोघांवर यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. रश्मी पाटील यांनी प्रथमोपचार केले. योगेश भारंबे याची प्रकृती खालवल्याने त्यास जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे, उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, सुशील घुगे, संजय देवरे यांनी भेट दिली. तहसीलदार कुंदन हिरे यांनी घटनेची माहिती घेत मंदिर संस्थान पदाधिकार्‍यांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या.