पाळधीच्या रोहिणी झंवर यांना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श समाजसेविका पुरस्कार

0

पाळधी- येथील रहिवासी व समाजसेविका रोहिणी मनोज झंवर यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनतर्फे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत भवनात ‘सन्मान सोहळा-2019’ या कार्यक्रमात त्यांना जळगांव शहरचे आमदार सुरेश भोळे व विधानपरीरषद आमदार चंदूभाई पटेल, ईकरा संस्थाध्यक्ष अ.करीम सालार, अ.मजीद जकेरीया, सामाजिक कार्यकर्त्या सरीता माळी, भावना शिर्सेकर, मौलाना आझाद फौंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. दरम्यान, रोहिणी झंवर यांनी बाल निरीक्षण गृहातील मुला-मुलींना शालेय साहित्य वाटप करणे, स्वतःचा वाढदिवस त्या मुला-मुलींसोबत साजरा करणे तसेच विविध सण सोबत साजरा करून त्यांचा आनंद द्विगुणित करणे आदी उपक्रम राबवल्याने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झंवर यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.