पाळधीच्या रोहिणी झंवर यांचा जळगावात सन्मान

0

आदर्श समाजसेविका पुरस्कार देवून मान्यवरांनी केला गौरव

जळगाव- पाळधी येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी मनोज झंवर यांना जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात हजरत बिलाल बहुउदेशीय सोसायटी, जळगावतर्फे आदर्श समाजसेविका पुरस्काराने गौरवण्यात आले. रोहिणी झंवर यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवून हा पुरस्कार देण्यात आला. झंवर यांनी बाल निरीक्षण गृहातील मुला-मुलींना शालेय साहित्य वाटप करणे, स्वतःचा वाढदिवस त्या मुला-मुलींसोबत साजरा करणे, सण सोबत साजरा करून त्यांचा आनंद द्विगुणित करणे, महिला सक्षमीकरण आधी कामात सक्रिय पुढाकार घेतल्याने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून सन्मानीत करण्यात आले. त्यांना या आधीदेखील सहा पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान, शासन नोंदणीकृत नॅशनल अ‍ॅन्टी हॅरेशमेंट फाऊंडेशनतर्फे झंवर यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून भोपाळ येथे ऑगस्ट महिन्यात एका कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. झंवर यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.