जळगाव। पाळधी गावाजवळ महामार्गावर दुचाकीला मागून येणार्या खासगी ट्रॅव्हल्सने धडक दिल्याची घटना गुरूवारी ्रपहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
एरंडोल तालुक्यातील बाम्हणे येथील एकनाथ विठ्ठल माळी (वय-52) हे त्यांच्या दुचाकीने (क्र. एमएच-19-सीए-2779) गुरूवारी पहाटे पाळधीगावातून जळगावकडे येत होते. पाळधी बायपास रस्त्यावर मागून येणार्या ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात माळी दुचाकीवरून फेकले जावून गंभीर जखमी झाले. त्यांना सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.