पाळधीतील महिलांना मारहाण करणार्‍यास अटक

जळगाव- धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील दोन महिलांना शिविगाळ व मारहाण करुन जखमी करणार्‍याआरोपीस पोलिसांनी अटक केली. गंभीर जखमी महिलेस गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पाळधी येथील हॉटेल हिमालयच्या ओट्यावर बसलेल्या सचिन चौधरी याने काही कारण नसताना एका महिलेस शिविगाळ केली. तू पंजाबी ड्रेस का घातला? असे विचारुन त्याने महिलेस बेदम मारहाण केली. तसेच त्याने दुसर्‍या महिलेस सुद्धा मारहाण केली. महिलेच्या फिर्यादीवरुन सचिन चौधरी याच्या विरुद्ध पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास कॉन्स्टेबल अरुण निकुंभ करीत आहेत.