पाळधीत आरोग्य केंद्राचे भुमिपुजन

0

पाळधी। पाळधी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली असून 2.49 कोटी मंजुर झाले. इमारतीचे भुमिपूजन आज शनिवार 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ.दिपक सावंत यांच्याहस्ते भुमिपूजन पाळधी येथे होत आहे. तीन एकर जागेत हा दवाखाना सुरू होणार आहे. 2 मेडीकल ऑफीसरसह 20 कर्मचार्‍यांचा स्टाफ येथे 24 तास सेवा देणार आहे. पाळधी परिसरातील 30 ते 35 गावांना याचा लाभ होणार असून या कार्यक्रमास शिवसैनिक व पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पं.स.सदस्य मुकुंदराव नन्नवरे, तालुकाप्रमुख गजानन पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, तालुकाप्रमुख नाना सोनवणे, सरपंच अलिम देशमुख, सरपंच वैशाली माळी यांनी केले आहे.

यांची लाभणार उपस्थिती
यावेळी प्रमुख अतिथी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जि.प. अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी मंत्री सुरेश जैन, खासदार ए.टी.नाना पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, सिव्हील सर्जन, डॉ.नागोराव चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, रावेर विभाग जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, पं.स. सभापती मंजुषा पवार, उपसभापती प्रेमराज पाटील, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, गोपाळ चौधरी, पवन सोनवणे, जिल्हा संघटक ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर आदी उपस्थित राहतील.