पहूर : शाळा हे ज्ञानदानाचे व संस्काराचे केंद्र म्हणुन ओळखले जाते त्यात पालक आपल्या चिमूकल्यांना शिक्षण घेणेसाठी पाठवितात ज्यातून देशाचे भावी नागरीक व सुजान व्यक्ति निर्माण व्हावे यासाठीच परंतु पाळधी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ शनिवार 18 नोव्हेंबर रोजी सकाळी शाळा भरण्याच्या वेळेस आढळलेला प्रकार अतिशय निंदनीय असाच म्हटला जाईल. याबाबत सविस्तार वृत्त असे की शनिवार रोजी सकाळची शाळा असल्याने व शालेय व्यवस्थापन सामितीची मासिक सभा असल्याने विद्यार्थी व पालक सकाळीच शाळेत येण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आले असता त्यांना शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ देशी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा मोठा प्रमाणात ढिग आढळून आला त्यामुळे परीसरात एकच चर्चेला उधाण आले व त्याठिकाणी गावातील पालक मोठ्या संख्येने जमा झाले काही पालकांनी पडलेल्या बाटल्या जमा करून गोणीत भरली असता त्या बाटल्यांची चक्क एक गोणी भरली.
पोलिस अधिक्षकांनी लक्ष देण्याची गरज
घटनास्थळी जमलेल्या पालकानी तसेच शालेय व्यवस्थापन सामिती अध्यक्ष भगक्तराज कुमावत यांनी यावेळी असे सांगितले कि शाळेच्या परीसरात मोठ्या प्रमाणावर अवैध प्रकारे दारू विक्री होत असुन त्यामुळे सदर प्रकार घडला असावा असेल तसेच जमलेल्या पालकामधून पहूर पो.स्टे. येथे भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून जाब विचारला की सर्वेाच्च न्ययालयाच्या आदेशानुसार महामार्गाच्या 500मीटर च्या आत दारू विक्री बंदी असतांना माञ पाळधी येथील गावात अध्याप हॉटेलांमध्ये सर्रास दारू विक्री कशी चालु आहे? अशी चर्चा सुरू आहे तसेच जमलेल्या पालकामधून असा सुर निघत होता की अधिकारी सुस्त. देशीवाले मस्त नागरिक त्रस्त असल्याची एकच जोरदार चर्चा रंगली असुन याकडे वरिष्ठ अधिकायांनी लक्ष घ्यावे अशी मागणी केली जात आहे.