पाळधी : धरणगाव पंचायत समितीतर्फे दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पाळधीच्या इंम्पिरिअल इंटरनॅशनल स्कूल येथे सुरूवात करण्यात आले. प्रदर्शनाचे बक्षीस वितरण शनिवार 17 डिसेंबरला सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी तालुक्यातील शाळांना संगणक देण्याची घोषणा केली. प्रदर्शनात प्राथमिक गटात पाळधी कन्या तर माध्यमिक गटात स.न.झंवर विद्यालयाच्या ‘सरकते प्रवेशद्वार व सोलरपासून वीजनिर्मिती करून शाळेला वापरणे’ या उपकरणास प्रथम क्रमांक मिळाला. या उपकरणाची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, उपशिक्षणाधिकारी डॉ. डी. एम. देवांग, स.न.झंवर विद्यालयाचे शालेय समितीचे चेअरमन सुनील झंवर, इंम्पिरिअल स्कूलचे चेअरमन नरेश चौधरी, मुकुंद नन्नवरे, बंटी पाटील उपस्थित होते.
सहकार रराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते प्रदर्शनात विजयी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक, 30 प्रगत, 2 आयएसओ, 3 गुणवत्ता पूर्ण शाळा व 10 उत्कृष्ट शाळा व्यवस्थापन समिती सदस्याचा सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्मृतीचिन्ह सुनील झंवर यांनी त्यांच्या मातोश्री कै.कांताबाई झंवर यांच्या स्मरणार्थ उपलब्ध करून दिले होते. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर यांनी केले. तर मान्यवरांचे स्वागत विस्तार अधिकारी ए.बी.बिर्हाडे, मिलिंद पाटील व केंद्रप्रमुखांनी केले.
प्रदर्शनात 141 विद्यार्थी, 183 शिक्षकांचा सहभाग
प्रदर्शनात 106 प्राथमिक, 35 माध्यमिक शाळेतील 183 शिक्षक व 141 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. परिक्षक म्हणून आर. पी. मुसळे, सुनील राठी, गुरूदत्त निंबाळे, रमेश जगताप यांनी काम पाहिले. शरद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
शाळांना संगणक देणार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात धरणगाव तालुक्यातील जिल्हापरिषद शाळांना संगणक देणार असल्याची घोषणा केली. तसेच तालुक्यातील शिक्षकांचे कार्य उत्कृष्ट असून शिक्षणात तालुक्याने आघाडी घेतली आहे. बालवैज्ञानिकांनी देखील सुंदर उपकरणे तयार करून एक प्रकारे परिक्षकांचीच परीक्षा घेतल्याचे सांगितले.
परीक्षेत या विजेत्यांना मिळाले बक्षीस
विद्यार्थी प्राथमिक गट – प्रथम क्रमांक खुशबु भाट (पाळधी कन्या), द्वित्तीय भावेश बडगुजर (इंम्पिरिअल स्कूल), तृतीय प्रदीप पाटील(रोटवद), उत्तेजनार्थ अलिम पिजांरी (पाळधी उर्दू), निखील सोनवणे (पाळधी).
विद्यार्थी माध्यमिक गट – प्रथम क्रंमाक हर्षदा चौधरी व मार्गदर्शक शिक्षक शीतल बडगुजर (स.न.झंवर विद्यालय पाळधी), द्वित्तीय निरंजन पाटील (बालकवी ठोंबरे विद्यालय, धरणगाव), तृतीय निखील पाटील (साळवे), उतेजनार्थ विशाल पाटील (पष्टाणे) व अनुष्का सपकाळे (पी.आर.हायस्कूल धरणगाव).
शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य – प्राथमिक गटात प्रथम ज्ञानेश्वर पाटील (झुरखेडा), द्वितीय शीतल पाडवी (पिंप्री), तृतीय भारती देशमुख (बांभोरी), सुधा खड (पाळधी), उत्तेजनार्थ गौरी सपकाळे (बांभोरी) व क्षमा साळी (एकलग्न).
माध्यमिक गटात – प्रथम नवनीत सपकाळे (धरणगाव), द्वितीय अंकुश पाटील (अनोरा), तृतीय भूषण बोरोले (साळवे).
लोकसंख्या शिक्षण प्राथमिक गटात – प्रथम विद्या चौधरी (पाळधी), द्वितीय निलिमा झांबरे, तृतीय आमिनशहा (फुलेनगर), उत्तेजनार्थ स्वप्नाली पाटील (पथराड).
माध्यमिक गटात – प्रथम योगेश पाटील (खर्दे), द्वित्तीय एन.जी.पाटील (धरणगाव).
प्रयोगशाळा परिचर – प्रथम डी.एस.गायकवाड (धरणगाव), द्वित्तीय मुकेश महाजन (साळवे).
प्रदर्शन पाळधी जि.प.शाळेत व्हावे
सरपंच अलीम देशमुख यांची मागणी
पाळधी येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत सर्व सुविधा उपलब्ध असून देखील शिक्षणाधिकारी यांनी पाळधी येथुन तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या सावदा रोडवरील एका खाजगी शाळेत विज्ञान प्रदर्शन आयोजीत केले आहे. ही शाळा राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्यामुळे येथून सतत वाहनाची वर्दळ असते. त्यामुळे विद्यार्थ्याच्या जीवनाला धोका असल्याने विज्ञानप्रदर्शन पाळधी येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतच व्हावे, अशी मागणी सरपंच अलीम देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. खाजगी शाळेत विज्ञान प्रदर्शन भरविण्या मागचा शिक्षणाधिकारी यांचा काय हेतू असू शकतो याची चौकशी करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य पी.पी.पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील, रामचंद्र सोमाणी, भगवान धनगर, सुनील ननावरे, नाना ठाकूर, राजू भोई, अन्वर शेख तसेच जि.प.शाळेतील मुलांच्या पालकांनी केली आहे.