पाळधी । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त आयोजित भीमगीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी आंबेडकरी जनतेच्या वतीने सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा जाहिर नागरी सत्कार करण्यात आला. पाळधी येथे मुंबई येथील प्रसिद्ध गायक कुणाल बोदडे व सुप्रसिद्ध गायिका वैशाली किरण यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
संविधानामुळेच इथपर्यंत पोहोचलो…
ना.पाटील सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, माझ्या सारख्यासामान्य कार्यकर्ता बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मंत्रीपदापर्यंत पोहचू शकला. डॉ.बाबासाहेब हे एका धर्माचे नसुन सर्व धर्माचे आहेत. असे मत त्यांनी व्यक्त केले. मी या सत्कारामुळे भाराऊन गेलोय, माझे अनेक सत्कार झालेत, पण माझ्या गावातला म्हणजेच माझा घरचा सत्कार हा माझ्या कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन ना पाटील यांनी केले.
यांनी घेतले परीश्रम
यावेळी मुकुंद सपकाळे, पं.स.सदस्य मुकुंद नंन्नवरे, प्रेमराज पाटील, भानुदास विसावे, सुनील चौधरी, जि.प. सदस्य प्रताप पाटील, सरपंच प्रकश पाटील, वसंत सपकाळे, अनिल पाटील, पं.स.सदस्य आसाराम कोळी मिलिंद नन्नवरे, उद्धव नन्नवरे, रूपेश नन्नवरे, मुकेश सोनवणे, नामदेव नन्नवरे, शंभु नन्नवरे, गोकुळ नन्नवरे, पिंटू कोळी, तुषार मोरे, बंटी नन्नवरे, गोपाल सोनवणे उपस्थित होते.