पाळधी । मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयेजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात मंत्री पाटील यांनी सांगितले की, गोरगरीब रुग्णांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा व खर्या अर्थाने त्यांची सेवा करता यावी यासाठी हिच शिवसेनेची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी स्व.पी.पी.पाटील यांच्या स्मरणार्थ धरणगाव व जळगाव तालुक्यातील शिवसैनिकांतर्फे कांताई नेत्रालय यांच्या सहकार्याने मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले होते.
कांताई नेत्रालयात करण्यात आल्या शस्त्रक्रिया
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे संघटक डॉ.राजेंद्र फडके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती सचिन पवार, जि.प.सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, पं.स.सदस्य मुकुंद नन्नवरे, डॉ.संजय चव्हाण, डॉ.संजय सोनवणे, डॉ.शिवराज पाटील, कांताई फाउंडेशनतर्फे डॉ.अमर चौधरी, डॉ.अरविंद राणे, माजी जि.प.सदस्य विश्वनाथ पाटील, डॉ.व्ही.आर.पाटील, डॉ.विजय विचवे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात सुमारे 52 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. स्व.पी.पी.पाटील यांच्या स्मरणार्थ धरणगाव व जळगाव तालुक्यातील शिवसैनिकांतर्फे कांताई नेत्रालय यांच्या सहकार्याने मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र चांदसर अंतर्गत 14 गावातील 589 रुग्णांची मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. तर 52 रुग्णांवर जळगावातील कांताई नेत्रालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. यशस्वीतेसाठी मुकुंद नन्नवरे, आबा माळी, चिंटू कोळी, हर्षल पाटील, मनोज नन्नवरे, भूषण पाटील,डॉ.शिवराज पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी कामकाज पाहिले.