जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील विवाहितेने राहत्या ढब्याच्या घरात रूमालाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी 4.15 वाजेच्या सुमारास घडली असून जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खूशी भूषण धनगर (वय-21) रा.पाधळी ता.धरणगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खूशी धनगर आणि भूषण धनगर यांचा मार्च 2018 मध्ये थाटात लग्न झाले होते. दैनंदिनप्रमाणे रोज सकाळी घरातील कामे उरकली होती. घरातील मंडळी शेतातील कामांसाठी शेतात गेले होते. त्यामुळे घरात खूशी धनगर आणि भूषण धनगर हेच दोघे होती. आज गुरूपौर्णिमा असल्याने गावातील प्रसिद्ध साईमंदीरात जाण्याचा त्याचा बेत होता. तसे खूशीने भूषणला सांगितले होते. दुपारी भूषण धनगर काही कामानिमित्त गावातून जावून येतो असे सांगून बाहेर पडला. त्यानंतर खूशीने बागायती रूमालाने घराच्या व्हेन्टीलेटरच्या आसारीला गळफास घेवून आत्महत्या केली. भूषण घरी परत आल्यानंतर खूशीने गळफास घेतल्याचे लक्षात आले. तातडीने रूमाल सोडून खाली उतरवून खासगी रिक्षाने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. सायंकाळी पाळधी गावातील नागरीकांची जिल्हा सामान्य रूग्णालयात गर्दी जमली होती.
आत्महत्याचे कारण गुलदस्त्यात
खूशी आणि भूषण यांच्यात कोणतेही वाद नाही असे गावातील तरूण व नागरीकांचे म्हणणे आहे. मात्र घरात कोणतेही भांडण नसतांना खूशीने आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका का घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान खूशीच्या माहेरच्या मंडळीदेखील जळगाव येण्यासाठी धाव घेतली आहे. माहेरची मंडळी आल्याशिवाया मृतदेहावर शवविच्छेदन करू नये असा पवित्रा घेतला आहे. वैद्यकिय अधिकारी यांच्या खबरीवरून जिल्हा पेठ पोलीस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.