वाकड : पाळीव कुत्र्याला पकडून बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली. नंतर त्याला अज्ञातस्थळी बेवारस सोडणार्या सुरक्षारक्षकाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. दीपक सूर्यभान आचार्य (वय 41, रा. गणेशनगर, थेरगाव) असे त्याचे नाव आहे. कुत्र्याचे मालक अनुपा अतुल गाडे (वय 47, रा. द वूडस सोसायटी, वाकड) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार पाळीव प्राणी संरक्षण कायदा 1960 चा अधिनियम कलम 11 (क) (1) आयपीसी 429,एमपी 119 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. याबाबत उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी दिलेली माहिती अशी, आरोपी हा या सोसायटीत सुरक्षा रक्षकाचं काम करतो. त्याने येथील एका कुत्र्यास पकडून लाकडी दांडक्याने क्रूरतेने मारहाण करून बेशुद्ध पाडले, त्यानंतर त्याला पोत्यात भरून अज्ञात ठिकाणी सोडून दिलं. हा प्रकार तक्रारदाराने पाहिल्यानंतर कुत्र्याला परत आणून त्याच्यावर उपचार केले.