पावणेपाच लाखांचा ऑनलाईन गंडा

0

पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील एका व्यावसायीकाचे मोबाईल सिम कार्ड वापरून त्याच्या कंपनीच्या बँक खात्यामधील तब्बल 4 लाख 88 हजार रुपये परस्पर स्वत:च्या खात्यात टाकून एका अज्ञात ठगाने गंडा घातला आहे. ही घटना 25 ते 27 मार्च या दरम्यान झाली आहे. सुधीर पिंपळे (वय 51, रा. तानाजीनगर, चिंचवड) असे गंडा बसलेल्या व्यावसाईकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी एका अज्ञात इसमाविरुध्द चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फसवणूकीची नवी पद्धत
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधीर पिंपळे हे वापरत असलेला मोबाईल क्रमांक एका अज्ञात व्यक्तीने त्याचा असल्याचे सांगून तो मोबाईल क्रमांक सर्वप्रथम बंद केला. तसेच तो मोबाईल क्रमांक पुन्हा बनावट कागदपत्र सादर करुन सुरु केला. तसेच तो मोबाईल क्रमांक पिंपळे यांनी त्यांच्या कंपनीच्या बँक खात्याला लिंक केलेल्या बँक खात्यातून ऑनलाईन पध्दतीने 4 लाख 88 हजार रुपये स्वत: च्या बँक खात्यात टाकले. यामुळे पिंपळे यांचे मोठे आर्थीक फसवणूक झाली आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.