पावसाचा जोर कमी झाल्यान निवडणुका झंझावत

0

खासगी शिक्षक घरोघरी जावून मतदारांचे करताहेत वाटप

जळगाव । गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण अधिक वाढल्याने इच्छूक उमेदवारांना प्रचारात मोठ्या अडचणी निर्माण होवून त्यांच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती. मात्र प्रत्येक वार्डात उभे असलेल्या उमेदवारांकडून जोरदार प्रचाराला सुरूवात झाली आहे. निवडणुकीत हौसे, नौसे आणि गौसे यांनी उमेदवारी अर्ज करून आपणच वार्डात जिंकून येणार असल्याचा दावा केला आहे. यात काही उमेदवारांनी देवाला नवस करून वार्डातील विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहे असा आश्‍वासन देतांना दिसून येत आहे. प्रत्येक वार्डात निवडणूक ही चुरशीची असल्याने जो-तो आपल्या परीने जोर लावण्याचा प्रयत्न करत आहे. यात मातब्बर उमेदवार पैश्यांच्या जोरावर आपला प्रचार करत आहे. काही ठिकाणी तर महिला व अबालवृद्ध रोजंदारीवर देखील प्रचार करतांना दिसत आहे. मात्र, हा पैश्यांचा देखावा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दिसून पडणार आहे. यावेळी प्रचारात सहभागी झालेले तरूण, तरूणी, महिला व वृद्ध महिलांसाठी सकाळी कार्यालयासमोर चहा व नास्त्याची सोय देखील करण्यात आले आहे.

सोशल मिडीयावर अधिक भर
प्रभाग निहाय मतदार याद्या तयार झाल्यानंतर गल्लीतील काही पंटरांना सोबत घेवून घरोघरी जावून मतदारांना आपले नाव यादीत असल्याचे सांगून आपले जवळचे मतदान केंद्रांची माहिती देण्यात येत आहे. तर खासगी शिक्षकांवर सोपविलेले नव्याने प्रिंट केले मतदान कार्ड घरी पोहचविण्याची कामगिरी चोख बजावत आहे. वार्डनिहाय व्हॉट्सअ‍ॅपचे गृप आणि फेसबुकचा अधिक वापर करून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू आहे. सोबत बॅनर, होर्डीग्ज, ऑटो रिक्षा, स्पिकर, ध्वनिवर्धक कर्णे आदि प्रचार, प्रसारात कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर ओसंडून वहात असतो. चहा, नाशता, अल्पोपहार, दूपारचे जेवण जसा वेळ मिळेल तसे खाणे अशा धावपळीत निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना मतदारांसाठी एरवी नसला तरी या निवडणूकीच काळात मतदारांची भेट घेणे आवश्यकच आहे. या निवडणूकीत आप्पा, तात्या, भाऊसाहेब, दादासाहेब यांचे मार्गदर्शन, सहकार्यच नव्हेतर त्यासोबत आशिर्वाददेखिल हे आवशयक असतात. नेमक्या अशा वेळी शहरपरीसरात झिमझिम पावसाने फटकेबाज बॅटींग करून आजी, माजी तसेच हौसेखातर निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांना चांगलेच जेरीस आणले आहे.