पिंपरी-चिंचवड । सोमवारी रात्रीपासून पिंपरी-चिंचवड शहरासह मावळात जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणातून बुधवारी सकाळपासून 2867 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खळाळणार्या पवना नदीचे रावेत येथील विहंगम दृश्य.