पिंपरी-चिंचवड : आकुर्डी, रावेत, निगडी, प्राधिकरण भागात सोमवारी दुपारी पावसाने अचानक हजेरी लावली. भर हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने शहरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेली पावसाने वाहतुकीचा काही प्रमाणात खोळंबा झाला. ऐन हिवाळ्याच्या दिवसात अचानक पाऊस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मागील दोन दिवसांपासून शहरासह इतर परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. ढगाळ वातावरणामुळे सूर्यनारायणाने देखील मागील दोन दिवसांपासून वेळोवेळी दर्शन देणे टाळले. हवामान खात्याने देखील आणखी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत हवामान अंशतः ढगाळ राहण्याचाही अंदाज आहे.