पावसात वीज गुल झाल्याने नागरीक हैराण

0

जळगाव । मृग नक्षत्राच्या प्रारंभीच जोरदार पावसाने हजेरी लावून जळगावकरांना दिलासा तर मिळाला, मात्र वीज गूल झाल्याने बुधवारी व गुरुवारी संध्याकाळपर्यंत विजेचा चांगलाच ‘झटका’ सहन करावा लागला.

बुधवारी रात्री अनेक भागात तीन-तीन तास वीज गायब असल्याने तर गुरुवारीही दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक चांगलेच घामाघूम झाले. आधीच पाणीपुरवठा विस्कळीत असताना वीजच नसल्याने नागरिकांना पाण्यापासूनही वंचित रहावे लागले. तीन दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्याच पावसाने वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर दोन दिवसात कोठे काही मान्सूनपूर्व कामे बाकी आहे का? याची पाहणी न झाल्याने बुधवारी रात्री पुन्हा पाऊस सुरू होताच वीज गूल झाली. त्यात जोरदार पाऊस असल्याने बिघाड काढला गेला नाही व अनेक भागात तीन-तीन तास वीज पुरवठा खंडित राहिला.