पावसाने शेतकर्‍यांची त्रेधातिरपीट

0

किन्हवली । किन्हवली, शेंदुण, अस्नोली, शेणवे, डोळखांब, टाकीपठार आदी परिसरात पावसाने सकाळी 10 वाजता अचानक हजेरी लावल्याने शेतकर्‍यांची त्रेधातिरपीट उडाली. खळ्यात ठेवलेले भाताचे भारे व पेंढ्या भिजून काळ्या पडू नये म्हणून त्यावर प्लास्टिकचे आवरण व ताडपत्री टाकण्यासाठी धावपळ करावी लागली. अगोदरच पावसाचे पाणी शेतात असल्याने भात कापणीची कामे अजूनही शिल्लक असताना अचानक आलेल्या अस्मानी संकटाने शेतकरी धास्तावले आहेत. कर्जमाफी जाहीर करून बँकेच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नसल्याने फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना आता निसर्गानेही हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतित आहे.