रत्नागिरी – मोसमी पाऊस वेळेवर सुरु होत तो यंदा चागला बरसणार असल्याचा अंदाज सुरुवातीला वर्तवण्यात आला. मात्र राज्यातील काही भागात पाऊस झाला तरी तो असमाधानकारक ठरत होता. मात्र शुक्रवार व विशेषत: शनिवारी रात्री व रविवारी दिवसाही राज्याच्या अनेक भागात झालेल्या पावसाने व विदर्भातही सोमवारी सरीवर सरी कोसळल्याने राज्याला अल्पसा दिलासा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. शुक्रवारपासून राज्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. गेल्या 48 तासात झालेल्या पावसाने जवळपास पंधरा दिवसांची कसर भरुन काढली, असे मानले जात आहे.
केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर कोकण आणि मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले मात्र काही काळातच पावसाने ब्रेक घेतला व राज्यातील शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र शुक्रवारनंतर झालेल्या पावसाने चांगलाच दिलासा दिल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्याच्या सर्वच भागात आता पेरण्यांनी जोर धरला आहे.
कोकणात शेतकामे वेगात
तळ कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानेे हजेरी लावली. राजापूर लांजा रत्नागिरी संगमेश्वर चिपळूण या सगळ्याच परिसरात रात्री पासून पावसाचा सरी सुरु आहेत. सिंधुदुर्गाच्या ही काही भागात या पावसाने हजेरी लावली आहे. सावंतवाडी, बांदा या भागात पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे कोकणातील शेतीच्या रखडलेल्या कामाला वेग येणार आहे.
विदर्भातही पाऊस
मुंबईसह कोकणात हजेरी लावणार्या पावसाने विदर्भात मात्र काहीशी उशीराच म्हणजे सोमवारी हजेरी लावली. पावसाच्या या दडीने नागपूरसह विदर्भातील शेतकरी चिंतेत होते. नागपूर, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अद्याप पावसाने हजेरी लावली नव्हती मात्र अखेर तेथेही पाऊस झाला आहे. 7 जूनला येणार्या मान्सूनचे आगमन तर झाले पण तरीही पाऊस आला नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. पावसाने अधिक उशीर केला तर दुबार पेरणीच्या संकटाला शेतकर्यांना सामोरे जावे लागेल अशी शंका आहे.