पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश

0

रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील आदिवासी भागाला काल झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून गहु,मका पिकांची नुकासान झाले असून या नुकसाग्रस्त पिकांची पाहणी तहसिलदार सौ उषाराणी देवगुणे यांनी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

या बाबत वृत्त असे की रावेर तालुक्यातील आदिवासी भागात गुलाबवाडी व पाल येथे अवकाळी पावसामुळे गहु व मका या पिकांचे नुकसान झाले असून सुमारे 80ते 90 शेतक-यांचे 80 हेक्टर वरील सुमारे 90 लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे यावेळी त्यांच्या सोबत मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळे आदी होते