पावसामुळे पाच रेल्वेगाड्या रद्द ; 33 गाड्या शॉर्ट टर्मिनेट

0

रेल्वे प्रशासनाविरुद्ध भुसावळात तीव्र घोषणाबाजी ; रेल्वे प्रवाशांना रूळ अडवत व्यक्त केला संताप ; रेल्वे सुरक्षा बलाच्या समजुतीनंतर साडेचार वाजता दोन्ही रेल्वेगाड्या रवाना ; महानगरी एक्स्प्रेस सोडण्यावरून प्रवाशांनी ‘गोदान’ रोखली ; जंक्शनवरील प्रवाशांच्या गोंधळाने दोन्ही गाड्या तास विलंबाने धावल्या

भुसावळ- मुंबईसह उपनगरांत कोसळत असलेल्या पावसानं हाहाःकार माजवला आहे. या पावसानं रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला असून भुसावळ विभागातून जाणार्‍या प्रवाशांना मंगळवारी पाच रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने मोठा मनस्ताप सोसावा लागला. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार मंगळवार, 2 रोजी पाच गाड्या रद्द करण्यात आल्या असून 33 गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या तर डाऊन मार्गावरील चार गाड्या उशिराने धावत आहेत. दरम्यान, मुंबईसह उपनगरांमध्ये ठिक-ठिकाणी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यानं ही परीस्थिती ओढवल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप मंगळवारी सोसावा लागला. भुसावळ जंक्शनवर महानगरी एक्स्प्रेस अगोदर सोडण्यावरून गोदान एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी महानगरीसमोर रेल्वे रूळांवर प्रवासी बसल्याने गोदान आणि महानगरी एक्स्प्रेस या गाड्या दोन तास स्थानकावर रखडल्या. आरपीएफ कर्मचार्‍यांनी प्रवाशांना समजावल्यानंतर दुपारी साडेचार वाजता महानगरी एक्स्प्रेस जळगावकडे रवाना झाली. दरम्यान, भुसावळ रेल्वे स्थानकासह विभागातील रावेरसह विविध स्थानकांवर मंगळवारी सकाळपासून काही गाड्या थांबवण्यात आल्या तर काही रद्द करण्यात आल्याची सूचना देण्यात आल्यानंतर प्रवाशांनी गोंधळ घालत संताप व्यक्त केला. रेल्वे प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत देण्याची सोय प्रशासनाने करीत शांतता राखण्याचे आवाहन केले.

दोन गाड्या रोखल्याने वाढला गोंधळ
महानगरी एक्स्प्रेस मंगळवारी दुपारी तीन वाजता प्लॅटफार्मवर आली तर यापूर्वीगोदान दुपारी एकला आल्यावरही तिला न सोडता महानगरीला सोडत असल्याने गोदानच्या प्रवासी संतप्त झाले व त्यांनी महानगरीच्या रेल्वे लाईनीत ठिय्या मांडल्याने त्यांनी महानगरी रोखून धरली. गाडीने हॉर्न दिल्यावर सर्व प्रवासी रेल्वे रूळांमध्ये बसून राहिले. रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक फौजदार डी.एल. शुक्ला, सहायक स्थानक प्रमुख आर.आर. निकम यांनी व जवानांनी तेथे थांबत महानगरी पहिले 4.30 वाजता काढली. त्यानंतर अवघ्या दहा मिनीटात गोदान एक्स्प्रेसही जळगावकडे रवाना झाली.

स्थानक संचालकांच्या दालनात गोंधळ
लखनऊ-एलटीटी ही गाडी भुसावळ जंक्शनवर टर्मीनेट केली जात असल्याची उद्घोषणा झाल्याने प्रवासी संतप्त झाले व त्यांनी स्थानक संचालक जी.आर. अय्यर यांच्या दालनात गोंधळ घातला. रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी गाडीतून खाली उतरून गाडी पुढे सोडण्याची मागणी करण्यात आली. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. प्रवाशांच्या माहितीसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले.

अप मार्गावरील पाच गाड्या रद्द
गाडी क्रमांक 12110 व 12109 अप-डाउन मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 22102 व 22101 अप-डाउन मनमाड-मुंबई राज्यराणी, गाडी क्रमांक 17618-17617 अप-डाउन नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 12118 -12117 अप-डाउन मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी, गाडी क्रमांक 12261 डाउन मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेस 2 जुलै रोजी रद्द करण्यात आली.

33 गाड्या शॉर्ट टर्मिनेट
गाडी क्रमांक 11402 अप नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस नागपूर ते नाशिकपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 11401 डाउन-मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस मुंबई ऐवजी नाशिक ते नागपूरपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 22886 अप टाटा लोकमान्य तिलक टर्मिनस एक्सप्रेस टाटावरून 30 जूनपर्यंत गाडी ईगतपुरीस्टेशन पर्यंतच चालवण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 22885 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस टाटा एक्सप्रेस 2 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ऐवजी इगतपुरी ते टाटा स्टेशनपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12112 अप अमरावती मुंबई एक्सप्रेस अमरावतीवरून 1 जुलै सोडण्यात आलेली गाडी देवळाली स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12111 डाउन मुंबई-अमरावती एक्स्प्रेस 2 रोजी मुंबईऐवजी देवळाली ते अमरावतीस्टेशनपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12810 अप हावडा मुंबई-एक्सप्रेस हावड़्यावरून 30 जून रोजी सुटणारी ही गाडी ईगतपुरीस्टेशन पर्यंततच चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12809 डाउन मुंबई-हावडा एक्सप्रेस मुंबई ऐवजी भुसावळ ते हावडा स्टेशनपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12541 अप गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गोरखपूर 30 जून रोजी सुटणारी गाडी ईगतपुरी स्टेशन पर्यतच चालवन्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12542 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसवरून 2 जुलै रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी ईगतपुरी ते गोरखपूरपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 17058 अप सिंकदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस सिकंदराबाद 1 रोजी सुटणारी गाडी नाशिकपर्यंत चालवण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 17057 डाउन मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस 2 रोजी मुंबई ऐवजी नाशिक ते सिकंदराबादपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 18030 अप शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनस शालिमारवरून 30 जून रोजी सुटलेली गाडी खेरवाडीस्टेशनपर्यंतच चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 18029 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस शालिमार एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसवरून 2 रोजी सुटणारी गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी भुसावळ ते शालिमारपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12106 अप गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस गोंदियावरून 1 रोजी सुटलेली गाडी नाशिकपर्यंतच चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12105 डाउन मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस मुंबई ऐवजी नाशिक ते गोंदियापर्यंतच चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12318 अप फिरोजपूर मुंबई पंजाब एक्स्प्रेस फिरोजपूरवरून 30 रोजी सुटलेली गाडी मनमाड स्टेशनपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12137 डाउन मुंबई फिरोजपूर-पंजाब एक्सप्रेस 2 रोजी मुंबईऐवजी मनमाड ते फिरोजपूरपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 11058 अप अमृतसर मुंबई एक्स्प्रेस अमृतसरवरून 30 रोजी सुटलेली गाडी मनमाडस्टेशन पर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 11057 डाउन मुंबई अमृतसर एक्स्प्रेस 2 रोजी मुंबईऐवजी मनमाड ते अमृतसरपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12140 नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस नागपूरवरून 1 जुलै रोजी सुटणारी गाडी भुसावळ पर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12139 डाउन मुंबई-नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस 2 रोजी मुंबई ऐवजी भुसावळ ते नागपुर स्टेशन पर्यतच चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12880 अप भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेस भुवनेश्वर वरून 1 रोजी सुटलेली गाडी मनमाडस्टेशनपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12879 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस भुवनेश्वर एक्सप्रेस 3 जुलै रोजी एलटीटी ऐवजी मनमाड स्टेशन ते भुवनेश्वर स्टेशनपर्यंतच चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12072 अप औरंगाबाद दादर जनशताब्दी एक्स्प्रेस 2 जुलै रोजी सुटणारी गाडी मनमाड स्टेशनपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12071 डाउन दादर औरंगाबाद जनशताब्दी एक्सप्रेस 2 रोजी दादरऐवजी मनमाड स्टेशन ते औरंगाबाद स्टेशनपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12290 अप नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस नागपूरवरून 1 रोजी सुटलेली गाडी नाशिक स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12102 अप हावडा लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेस हावडावरून 30 रोजी सुटलेली गाडी ईगतपुरीपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12361 अप आसनसोल मुंबई एक्सप्रेस आसनसोलवरून 30 रोजी सुटणारी गाडी इगतपुरी स्टेशनपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 01024 अप गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेस गोरखपूरवरून 30 रोजी सुटलेली गाडी मनमाडपर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12187 अप जबलपूर-मुंबई गरीबरथ एक्स्प्रेस जबलपूरवरून 1 रोजी सुटलेली गाडी मनमाडपर्यंत चालवण्यात येणार आहे.

चार गाड्या उशिराने
गाडी क्रमांक 11093 डाउन मुंबई-वाराणसी महानगरी एक्सप्रेस निर्धारीत वेळेपेक्षा 13 तास 45 मिनिटे उशिराने धावणार आहे. गाडी क्रमांक 12167 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनल्स वाराणसी एक्सप्रेस निर्धारीत वेळेपेक्षा 13 तास 30 मिनिटे उशिराने सुटणार आहे. गाडी क्रमांक 22129 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस अलाहाबाद तुलसी एक्सप्रेस निर्धारीत वेळेपेक्षा 16 तास 25 मिनिटे उशिराने सुटणार आहे तसेच गाडी क्रमांक 12859 डाउन मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस निर्धारीत वेळेपेक्षा 13 तास 15 मिनिटे उशिराने सुटणार आहे.