पावसामुळे सोयाबिन,कापसाचे नुकसान

0

परतीच्या पावसाने वातावरणात गारवा

जळगाव- यंदा परतीचा पाऊस लांबल्याने हवामान खात्याने दि.24 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.दरम्यान,शुक्रवारी सकाळपासून उन्ह-सावलीचा खेळ सुरु होता.दुपारी अचानक झालेल्या पावसाने वारावरणात गारवा निर्माण झाला.मात्र या पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा जोरदार पाऊस झाला.त्यामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे.यंदा परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्याने हवामान खात्याने अतिवृ÷ष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात सध्या खरीप हंगाम असून सोयाबिन आणि कापूस काढण्याचे काम सुरु आहे.शुक्रवारी दुपारी झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.

बाजारपेठेत उडाली तारांबळ
परतीच्या पावसाने दुपारी अचानक हजेरी लावल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.तासभर झालेल्या पावसाने वातावरणात गारवा देखील निर्माण झाला.