जळगाव। यंदा पावसाळा लवकर सुरु होणार असल्याने शेती लागवडीला देखील दरवर्षी प्रमाणे लवकर सुरुवात होणार असल्याचे संकेत आहे. 30 मे रोजी मान्सुन केरळात दाखल झाले. केरळात मान्सुन दाखल झाल्यानंतर साधारण आठवड्याभरानंतर महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन होते. दरम्यान केरळमध्ये मान्सुन दाखल झाल्याने महाराष्ट्रातील हवामानात बदल झाले आहे. मान्सुच्या आगमनानंतर महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाले आहे. आठवड्याभरापूर्वी तापमानाची तिव्रता अधिक होती त्यामुळे शेती कामांची गती मंदावली होती. मात्र चार पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने आणि जिल्ह्याभरात पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्याने शेती कामांना सुरुवात झाले आहे. उन्हामुळे खोळंबलेल्या शेती मशागतीला आता वेग आला आहे.
धुळ पेरणीला सुरुवात
साधारण धुळ पेरणी अर्थात उन्हाळी कपाशी लागवडीला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात होतेे. मात्र आठवड्याभरापूर्वी उन्हाची तिव्रता अधिक होती त्यामुळे उन्हाळी लागवड रखडली. जूनच्या पहिल्या आठवड्यात रोहीणी नक्षत्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याने वातावरणातील उन्हाची तिव्रता कमी झाल्याने उन्हाळी लागवडीला सुरुवात झाली आहे. आठवड्याभरापूर्वी फक्त 2.5 टक्के धुळ पेरणी झाली होती.
खरीप लागवड नाही
केरळात मान्सुन दाखल झाल्याने महाराष्ट्रात हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्याचे चाहुल लागल्याने शेती कामाला वेग आला आहे. रोहीणी नक्षत्रात जर पाऊस झाला तर मृग नक्षत्रात कमी पाऊस पडतो असे पूर्वजांचे मत असल्याने शेतकरी खरीपाच्या लागवडीची घाई करतांना दिसत नाही. जोरदार पाऊस झाल्याशिवाय शेतकरी खरीप लागवड करणार नाही.
कापसाचे क्षेत्र जास्तच
खरीप लागवडीला सुरुवात होणार असल्याने तसेच कापसाचे लागवड क्षेत्र अधिक असल्याने कापूस बियाण्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मागील वर्षी चांगल्या उत्पन्न मिळालेल्या बहुतांश बियाण्यांवर यावर्षी बंदी घालण्यात आली आहे. राशी 659 या बियाण्याचे उत्पन्न अधिक असल्याने यावर्षी सर्वाधिक मागणी होती. त्यावर बंदी असल्याने कापूस बियाण्यांबाबत शेतकर्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.