पावसाळी अधिवेशनाची सांगता

0

नवी दिल्ली | संसदेचे पावसाळी अधिवेशन फलदायी ठरले आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विविध मुद्यांवरील चर्चेत सर्वच राजकीय पक्षांनी सहभाग घेतल्याचे संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी म्हटले आहे. 17 जुलै 2017 ते 11 ऑगस्ट 2017 या कालावधीत हे अधिवेशन पार पडले. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनात 19 बैठका झाल्या. लोकसभेत 77.94 % तर राज्यसभेत 79.95 %  कामकाज झाले.

“भारत छोडो” आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये 9 ऑगस्ट 2017 रोजी विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले होते आणि प्रथमच सर्व पक्षांनी एकमताने 2022 पर्यंत नवीन भारत निर्माण करण्यासाठी “संकल्प से सिद्धी” शपथ घेतली असे अनंतकुमार यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरमध्ये वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू केल्याबाबत ते म्हणाले की, हे ऐतिहासिक यश आहे. यामुळे या राज्याचे देशाच्या उर्वरित भागाशी आर्थिक एकात्मिकरण होण्यास मदत होईल.