पावसाळी आजारांवर बैठक

0

पुणे : ऐन पावसाळ्यात शहरात संसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणावर पसरत असून डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लूसारख्या साथींचे आजार वेगाने पसरण्याची भीती आहे. त्यावर महापालिका प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीच्या बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. पुणेकरांना गाळमिश्रित पाणी प्यावे लागत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीची बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्या, तसेच साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करावी, अशी मागणीही पत्रकात नमूद करण्यात आली आहे.