येरवडा : चंदननगर भाजी मार्केट हनुमान मंदिरासमोरील पावसाळी लाइन टाकणे या कामाचे भूमिपूजन आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. या लाइनमुळे परिसरात साचणार्या पाण्याची समस्या सुटणार आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. काम चालू असताना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगरसेवक महेंद्र पठारे यांनी केले. प्रसंगी नगरसेवक महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, नगरसेविका संजिला पठारे, सुमन पठारे, विनोद पठारे, कैलास जावळकर, किरण पठारे, चिराग टोपे, कमलेश पठारे, तानाजी देशमुख, सुनील शिर्के, अविनाश भदारके, विकी खवले, अय्याज शेख व परिसरातील नागरिक उपस्थित होते.