पावसाळ्यातही पाण्याची समस्या

0

तळेगाव । सध्या राज्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक धरणे पाण्याने भरली आहेत. परंतू, ऐन पावसाळ्यात पंचायत समितीमार्फत संगमनेर तालुक्यातील 13 गावे व 58 वाडयांना 13 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्यातही पाणीटंचाईचा प्रश्‍न नागरिकांना भेडसावत आहे.

संगमनेर तालुक्यातील दुष्काळपीडित तळेगाव व निमोण भागात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे पाणीटंचाईची धग पावसाळ्यातदेखील कायम आहे. तलाव, ओढे, नाले अद्याप कोरडेठाक असून विहिरी व कूपनलिकांना पाण्याचे उद्भव वाढले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे.