भुसावळ। पावसाळ्यातही राज्यात विजेच्या तुटवड्याची परिस्थिती मात्र कायम आहे. कोळशासह पाण्याअभावी परळीतील सर्वच संचातून वीज निर्मिती ठप्प पडली आहे तर दुसरीकडे दीपनगरातील केवळ संच क्रमांक चारमधून वीज निर्मिती सुरू आहे. दुरुस्तीमुळे अनेक दिवसांपासून संच क्रमांक 5 बंद आहे. शनिवारी राज्याची विजेची मागणी 19 हजार 99 मेगावॅट असूनही प्रत्यक्षात मात्र 13 हजार 527 मेगावॅट वीजपुरवठा झाल्याने एनटीपीसीकडून महानिर्मितीला वीज घेण्याची वेळ आली. प्रदूषण व वीज महाग पडत असल्याचे कारण पुढे करीत दीपनगरातील 280 मेगावॅटचे संच क्रमांक एक व दोन बंद ठेवण्यात आले आहेत तर पाचशे वॅटच्या संच क्रमांक चारमधून शनिवारी 480 वॅट विजेची निर्मिती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दुरुस्तीच्या कारणामुळे संच क्रमांक पाच बंद ठेवण्यात आला आहे. 15 ऑगस्टपर्यंत या संचातून पूर्ववत वीज निर्मितीची प्रक्रिया पार पडणार आहे.
आर.आर. बावस्कर, मुख्य अभियंता, दीपनगर