पावसाळ्यातही शहरवासीयांना होतोय शुद्ध पाण्याचा पुरवठा

0

भुसावळ । शहरात एरव्ही पावसाळ्यात शहरवासीयांना गढूळ व दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करून आजारांना सामोरे जावे लागत असताना यंदा मात्र या चित्रात बदल झाला आहे. अर्थात त्यासाठी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, पाणीपुरवठा सभापती किरण कोलते यांनी जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेत आमुलाग्र बदल केले आहेत. जलशुद्धीकरण प्रक्रियेसाठी पुरेसा अ‍ॅलम व क्लोरीनसाठा उपलब्ध करण्यात आला आहे शिवाय दररोज जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याची तपासणी केली जात असल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जलशुद्धीकरणाची यंत्रणा ब्रिटीशकालिन असलीतरी त्यात आहे त्या साधनांद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा शहराच्या कुठल्याही भागात टँकर सुरू करण्याची वेळ आली नाही, तसे नियोजन केले.
रमण भोळे, नगराध्यक्ष, भुसावळ