वरणगाव। पावसाळ्यात वातावरणात बाष्प व ओलसरपणामुळे विविध त्वचेच्या विकारात वाढ होत असते. वेळीच लक्ष न दिल्यास विविध विकारांना निमंत्रण मिळते. यात प्रामुख्याने त्वचेचे विकार होत असतात. गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाच्या चांगल्या सरी पडत आहेत. यामुळे सुर्यनारायणाचे दर्शन झाले नाही. याचा परिणाम म्हणून सर्वत्र वातावरणात ओलसरपणा जास्त आहे. या ओलसरपणाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. दररोज घालावयाचे कपडे पुर्ण पणे कोरडे होत नाही.
डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज
परिणामी ओलसर कपडे घातल्याने फंगल इन्फेक्शन प्रकारातील गजकरण म्हणजे लाल गोल चट्टे येणे व त्यावर खाज सुटणे, सुरमा हा विकार पाठीवर आढळतो. त्यात त्वचेचा रंग नेहमीच्या त्वचेपेक्षा वेगळा असुन काळा अथवा पांढरा होत असतो. त्यावर खाज कमी प्रमाणात असते. डोके ओलसर झाल्यामुळे डोक्यात कोंडा होण्याच्या प्रकारात वाढ होते. यामुळे काही वेळा डोक्यात खाज देखील येते तर पाय सतत पाण्यात राहिल्याने पायाच्या बोटांमधे चिखल्या होणे असे त्वचेचे विकार होत असतात. या विकारावर त्वरीत डॉक्टरांना भेटून सल्ला घेतला पाहिजे. अन्यथा आजाराचे उग्र धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धुतलेले कपडे किमान 2 तास ऊन्हात वाळल्यानंतरच कपडे घालावीत. ओलसर असल्यास त्यांना प्रेस करावी. पावसात ओले झालेले शरीर त्वरीत कोरडे करावे. जिन्स, लेगेन्स अशी घट्ट कपडे न घालता कॉटनचे सैल कपडे वापरावे व भरपूर पाणी पिणे व सकर आहाराकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे.
प्रतिभा बोरोले,
त्वचा रोग तज्ञ