पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होता कामा नये – आमदार लांडगे

0

भोसरी :-पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहे. दरम्यान, पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडतात. मात्र नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने योग्य दखल घेवून त्यासाठी काय ते नियोजन करावे. भोसरी विधानसभा मतदार संघातील महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी व काही ठिकाणाचे ट्रान्सफर ‘ओव्हर’ लोड झाले असल्याने ते बदलण्यात यावेत, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत. तसेच नवीन ग्राहकांना त्वरित वीज मीटर उपलब्ध करुन देण्यात यावेत. धोकादायक वायर ‘अंडरग्राऊंड’ करण्यात याव्यात, असेही ते म्हणाले.

यांची होती बैठकीला उपस्थित
शुक्रवारी भोसरी विधानसभा विद्युत समितीची आढवा बैठक भोसरीत पार पडली. यावेळी आमदार व समितीचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता तथा समितीचे सह अध्यक्ष मदन शेवाळे, नगरसेवक व समितीचे सदस्य राहुल जाधव, कुंदन गायकवाड, राजेंद्र लांडगे, विकास डोळस, सागर गवळी, उत्तम केंदळे, नगरसेविका व सदस्या सारिका बो-हाडे, सोनाली गव्हाणे, अश्विनी बोबडे, सुवर्णा बुर्डे, उपविभागीय अभियंता बापूराव भरणे, ग्राहक प्रतिनिधी मच्छिंद्र दरवडे, परिक्षित वाघेरे, निलेश भालेकर, राहुल शिंदे, सम्राट भागवत, अशासकीय प्रतिनिधी सुहास ताम्हाणे बैठकीला उपस्थित होते.