पावसाळ्यात वीज यंत्र काळजी पूर्वक हाताळावे

0

जळगाव। पावसाळ्याच्या दिवसात वीजेमुळे होणार्‍या अपघाताचे प्रमाण वाढत असून ही चिंतेची बाब आहे. प्रत्येकाने जीवित व वित्त सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्यास शुन्य वीज अपघात हे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे. अपघातमुक्त पावसाळ्यासाठी नागरिकांनी विद्युतसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.

पावसाळ्याच्या दिवसात वीजयंत्रणेतील तारा तुटणे, खांब वाकणे वा पडणे, रोहित्र (डिपी स्ट्रक्चर) वाकणे, वीजतारांवर झाडांची फांदी तुटून पडणे असे प्रकार होतात. विद्युत यंत्रणेतील कोणत्याही उपकरणांना स्पर्श करणे धोकादायक ठरू शकते.

विद्युत उपकरणांना स्पर्श करणे टाळावे
नागरिकांनी स्पर्श करणे टाळावे व संबंधित लाईनमनला किंवा महावितरणच्या नजिकच्या कार्यालयास कळवावे. घरातील विद्युत उपकरणे, विद्युत संच मांडणी व जोडणी, आर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री परवानाधारक व्यक्तिकडून करून घ्यावी. वादळ-वारा व पावसामुळे वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो. नैसर्गिक आपत्ती वा तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्यास नागरिकांनी संयम बाळगुन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यता आले आहे. आपत्ती टाळण्याकरीता तात्काळ महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा महावितरणच्या 24 तास उपलब्ध मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या 1912 वा 1800-233-3435 वा 1800-200-3435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.