जळगाव । मागील वर्षी महापालिकेतर्फे आरोग्यसेवा देण्यात गंभीर चुका झाल्या होत्या. यात शहरातील काही निष्पाप जिवांचा बळी गेला. याबाबत पालिका प्रशासनाला वारंवार निवदेनाव्दारे धोक्याची सूचना देऊनही कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती यामुळे शहराला साथीच्या रोगांचा समाना करावा लागला होता. यावर्षी निवडणूकीचे काम असल्याने प्रशासनाचे त्याकडे लक्ष असेल म्हणून प्रशासनाने याबाबत तातडीने बैठक बोलवून उपाययोजना करून अंमलबजावणी करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा माजी नगरसेवक व श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष कैलास सोनवणे यांनी पत्रकारपरीषदेत दिला आहे .
सदस्य नागरिकांच्या आरोग्यविषयी असंवेदनशील
सोनवणे यांनी सांगितले की, काही दिवसांपुर्वीच झालेल्या मनपाच्या सभेत आरोग्याच्या प्रश्नावर आक्रमक भुमिका घेण्याबाबत सोडुन साधी चर्चाही सदस्यांकडुन केली जात नाही व दुसरीकडे मात्र परस्पर मानधन काढल्याच्या विषयावर अक्रमकता दिसली ही बाब शहराच्या आरोग्यासाठी असंवेदनशील आहे. आता मी सभागृहाचा सदस्य नाही, नाहीतर मी हा विषय ऐरणीवर आणला असता पण एक जबाबदार नागरीक म्हणुन ते यावर्षी पुन्हा हा विषय पालीकाप्रशासनाला मागण्या व सूचनांच्या निवेदनाने देणार असल्याचे मत सोनवणे यांनी व्यक्त केले. मागील वर्षी पहिल्याच पावसात शहरातील जगवानी नगरातील रहीवाश्यांच्या घरात पाणी शिरले होते आणि अनेक वाहने व सामान त्या पावसात वाहून गेले याला कारण म्हणजे पालीकेतर्फे नालेसफाई झाली नाही,असाच प्रभाव शहरातील विविध भागांत दिसुन आला होता असे ही सोनवणे यांनी सांगितले. शहरात डेंग्यूचा प्रार्दुभाव वाढल्याने सोनवणे यांनी स्वखर्चाने फवारणी केली होती. प्रशासनाने यावर्षी स्वंत्रत यंत्रणा तयार ठेवावी अशी मागणी श्री. सोनवणे यांनी यावेळी केली. यासोबतच सुसज्ज साधनसामग्रीने परीपुर्ण 24 तास अखंड सरु असलेला आपात्कालीन कक्ष स्थापन करावा, नाले सफाई,गटारसफाई, महापालीकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये औषधी व अन्य साधनसामुग्रीने सज्ज ठेवावी. शहरातील खुल्या जागांवरील गवत काढावे आदी मागण्या त्यांनी केल्या.