लातुर । पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे नेते पाशा पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार विष्णू बुरगे यांच्या तक्रारीवरून पाशा पटेल यांच्याविरोधाच एफआयआर दाखल करण्यात आली. लातूर विश्रामगृहात हा सगळा प्रकार घडला.‘पेट्रोलची भाववाढ झाली, शहरात येण्यासाठीही शेतकरी आता विचार करेल, सरकारने शेतकर्यांची वाट लावली का?’ असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. त्यावर पाशा पटेल भडकले आणि शिवीगाळ केल्याचा दावा पत्रकाराने केला आहे.