पासपोर्ट मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार

0

हडपसर : भारताच्या प्रत्येक नागरिकांकडे पासपोर्ट असणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्याचा फायदा नागरिकांनी घ्यावा असे मत पुणे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी मांडले.

श्री विघ्नेश्वरा एज्युकेशन सोसायटी संचलित इंटरनॅशनल स्कूल ऑफ मॅनॅजमेन्ट अ‍ॅन्ड रिसर्च (आयएसएमआर) येथे मंगळवारी ‘आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या कायदेशीर चौकटी आणि पासपोर्ट साक्षरता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

गोतसुर्वे म्हणाले, विदेश मंत्रालयाने राबविलेल्या नवनवीन उपक्रमांमुळे आता पासपोर्ट मिळणे सहज शक्य झाले आहे. प्रत्येक नागरिकांकडे पासपोर्ट असावा हे आमचे मूळ उद्देश आहे आणि त्या दिशने आमची वाटचाल सुरू आहे. युवक उच्चशिक्षण घेतात पण त्यांना पासपोर्ट प्रक्रियेबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे त्यांची फसवणूक होते. विसा आणि पासपोर्टसाठी अर्ज करताना अर्ज व्यवस्थित भरला आणि सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील तर ते मिळणे अवघड नाही. यावेळी डॉ. निलेश भुतडा, डॉ. मंजू पुनिया चोप्रा, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.