भुसावळ । शहरातील सेंट अलॉयसिस शाळेत प्राथमिक विभागात नुकताच पासिंग ऑफ कलर्स डे एकत्रितपणे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सिस्टर अल्फोन्सा उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पालिका आरोग्य सभापती दिपाली बर्हाटे, दीपनगर विद्युत केंद्राचे सहाय्यक अभियंता प्रविण बुटे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे मार्च पास करीत शिस्तीचे प्रदर्शन दाखविले. तसेच विविध खेळ स्पर्धेत यश मिळविले.
हुजैब चव्हाणचे यश
कबड्डी त्यात लंगडी शर्यत, स्पून अॅण्ड मार्बल, कोन बॅलन्सींग आणि धावणे या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. यानंतर खेळात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. कोन बॅलेन्सींग स्पर्धेत इयत्ता दुसरीतील विद्यार्थी हुजैब हबीब चव्हाण याने विशेष यश संपादन केल्याबद्दल त्याचे शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सिस्टर सारिका यांनी कौतुक केले. याप्रसंगी व्यवस्थापन समिती सदस्या विश्रांती पाटील, ग्लोरिया पांडे, फ्रांसिस डिसील्वा
आदी उपस्थित होते.