यावल । तालुक्यातील किनगाव येथील बसथांब्यावर विद्यार्थ्यांसाठी पास सेवा केंद्र सुरू करावे, अशी मागणी आहे. काही वर्षांपासून पास सेवा केंद्र बंद झाल्याने विद्यार्थ्यांना जळगाव येथून पास काढावी लागते. त्यामुळे यावल आगाराचे उत्पन्न बुडत असल्याने उपाययोजना आवश्यक आहे.
व्यवस्था झाल्यास केंद्र सुरु करणार
तालुक्यातील पश्चिम भागात पंचक्रोशितील प्रमुख ठिकाण अशी किनगावची ओळख आहे. परिसरातील 15 ते 20 खेड्यांमधील सुमारे दीड हजार विद्यार्थी शिक्षणासाठी जळगाव आणि यावलला जातात. मात्र, केंद्र बंद झाल्याने यावल आगाराचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे यावल आगाराचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने या परिसरातच पास सेवा केंद्र सुरु करण्याची गरज आहे. यासंदर्भात सेवाभावी संस्थांनी एका कर्मचार्यासाठी आसनव्यस्था करून दिल्यास पास केंद्र सुरू केले जाईल, असे आगार व्यवस्थापक डी.जी.बंजारा यांनी सांगितले.