मुंबई : ‘मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा’चा हा चौथे वर्ष आहे. या सोहळ्यात परफॉरमन्स करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलाकार जय्यत तयारी करत आहेत.
सोशल मीडियावर कलाकारांचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत हे कलाकार त्यांच्या परफॉरमन्सची तयारी करताना दिसत आहेत. यावर्षी या सोहळ्यात स्वप्निल जोशी, स्मिता गोंदकर,अमृता खानविलकर दमदार परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. या सोहळ्यात अमृताचा ‘मुजरा’ आणि स्वप्निलचा रोमॅन्टिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल.