मुंबई : वादग्रस्त शो ‘बिग बॉस १२’च्या घरातील सदस्यांमध्ये बरेच वादविवाद झाले. मात्र, या सगळ्यानंतर घरातील सदस्यांसाठी फॅमिली स्पेशल एपिसोडचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धकांचे जवळचे नातेवाईक त्यांना भेटण्यास आले होते. जवळपास ३ महिन्यानंतर सदस्यांनी आपल्या घरच्यांना पाहिले. दीपिका कक्करचा पती शोहेब अब्राहम तिला भेटायला आला होता. दीपिका शोहेबला पाहून भावूक झाल्याचे दिसून आले. बिग बॉसच्या घरात जेव्हा शोहेब एन्ट्री करतो तेव्हा दीपिकाला पॉज केले जाते. यामुळे दीपिका शोहेबला केवळ बघू शकते तिला त्याच्यासोबत काही बोलता येत नाही.