अमळनेर। एका चांगल्या आणि विकासासाठी एकत्र येणार्या पिंगळवाडेसारखे आदर्श ग्राम कसे असावे याचे अनुकरण इतर गावांनी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी केले. नाबार्ड ग्रामीण संरचना विकास निधी अर्थसहाय्य व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून उभारेल्या सिसुदा अॅक्वाजलचे लोकार्पण जिल्हाधिकार्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक जी.एम सोमवंशी, उषाताई दाभाडे, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी अशोक पटाईत यांच्यासह जिल्हापरिषद सदस्या मीनाताई पाटील, सरपंच अलकाताई पाटील उपसरपंच बाळासाहेब पाटील, सदस्य सुमनबाई पाटील, सुभाष पाटील, सिंधुबाई दाभाडे, आशाबाई दाभाडे, धर्मा दाभाडे, आर.वाय.पाटील यांच्यासह कृषिभूषण सुरेश पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
गावात लोकवर्गणीतून केले काम
यावेळी 10 वाजता जिल्हाधिकारी पिंगळवाडे येथे दाखल झाले त्यांनी प्रारंभी अॅक्वाजल प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. व सर्व सरपंच सदस्य यांना बोलावून एटीएम कार्ड टाकून प्रकल्पाचा शुभारंभ केला व भिंतीवर लावलेल्या नामकरणाचे अनावरण केले. सकाळी 10 वाजता आलेले जिल्हाधिकार्यांनी यावेळी त्यांनी आधी सर्व गावाची पाहणी केली मंदिरांची पाहणी केली. व त्यानंतर गाव पाहून भारावून गेलेल्या जिल्हाधिकारी राजे निंबाळकरानी पिंगळवाडे गावासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून गावाच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची घोषणा केली. यावेळी आरोग्य, पाणी, शिक्षण, धर्म, वाचन, लोकवर्गणी आदि कामे करून विकास साधत असलेल्या गावाची प्रशंसा केली. शाळा अंगावान्वादी पाहून कौतुक केले. सर्वत्र डिजिटल सेवा होत असून त्याचा लाभ देखील घ्यावा असे आवाहन त्यांनी वयोवृद्ध नागरिकांना केले. यावेळी शेतकर्यांशी संवाद साधला व पर्जन्यमान कमी असून पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. खानदेशात सीताराम सुग्राम दाभाडे यांच्यासारखे जलसंपदा विभागात सचिव म्हणू काम केलेले माधवराव चितळे, उपजिल्हाधिकारी बी.एन.सैंदाणे देखील खान्देशातील आहेत. यामुळे गावाने लोकवर्गणीतून इतका मोठा विकास साधला हे भूषणावह आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हापरिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना ठेंग यांनी प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाकरखेडे येथील नाबार्ड योजनेंतर्गत शेती गट प्रवर्तक भटू पाटील यांनी केले.
3 तास थांबले जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी चक्क गावात तीन तास थांबले. त्यांनी शाळा, मंदिरे, यासह विविध विकासकामांची माहिती जाणून घेतली याच गावाचे रहिवासी बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता सीताराम सुग्राम दाभाडे यांच्या संकल्पनेतून गावाचा खरा विकास सुरु झाला. याच गावात सध्या मुर्तीजापूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले बी.एन.सैंदाणे यांनी आता वसा सुरु केला आहे. त्याची संपूर्ण माहिती घेतली.