डिजीटल शाळाच्या माध्यमातून राबविला उपक्रम
अमळनेर- तालुक्यातील पिंगळवाडे येथे 24 सप्टेंबर रोजी जि.प.उच्च प्राथमिक शाळेत इ.8 वी पुनर्रचित अभ्यासक्रम ऑनलाईन प्रशिक्षणास यशस्वी सुरुवात झाली. सदर ऑनलाईन प्रशिक्षणासाठी संगणक, प्रोजेक्टर द्वारे व्हर्च्युअल क्लासच्या प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी पिंगळवाडे शाळेचे उपशिक्षक तथा तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले. सदर ऑनलाईन प्रशिक्षणात सकाळ सत्रात 10:30 ते 11:30 मराठी बालभारती व दुपार सत्रात 3:30 ते 4:30 हिंदी सुलभभारती या दोन विषयांचे ऑनलाईन प्रशिक्षण यशस्वीपणे घेण्यात आले. याप्रसंगी अंतुर्ली केंद्राचे केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, सावखेडा केंद्राचे केंद्रप्रमुख एस्.बी.पाठक, अमळगांव केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख भगवान पाटील यांच्यासह अमळगांव, सावखेडा व अंतुर्ली केंद्रातील प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते.
यशस्वितेसाठी यां
डिजीटल इंडीयाची यशस्वी वाटचाल करत संपुर्ण राज्यातील शिक्षकांना एकाच वेळी व दुरस्थ शिक्षण पध्दतीने राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत व्हर्च्युअल क्लास च्या माध्यमातून जिओ टिव्हीवरील वंदे गुजरात चॅनल-1 या शैक्षणिक वाहिनीद्वारे लाईव्ह प्रक्षेपण करुन सदर प्रशिक्षण राज्यभर घेण्यात येत आहे. आठवीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण यशस्वीतेसाठी पिंगळवाडे शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना ठेंग, तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे, पदवीधर शिक्षक प्रविण पाटील व उपशिक्षक रविंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.
-फोटो आहे